Thursday, 30 April 2015

प्रदुषण मानवी जीवनाला एक शाप




विज्ञाच्या युगामध्ये मानवाला काही वरदान मिळाले आहे. त्यात काही गोष्टी आपल्या मानवी जीवनाला  हितकारक आहे, तसेच अपायकारक सुध्दा आहे त्यामध्ये प्रदुषण मानवी जीवनाला सुरवाती पासून एक शाप आहे, प्रदुषणाला मानव मजबूर आहे, अनेक प्रकारचे प्रदुषण या युगामध्ये पहायला मिळतात. त्यातील महत्वाचे प्रदुषण, वायु प्रदुषण, जल प्रदुषण, ध्वनी प्रदुषण, प्रदुषण म्हणजे ज्या गोष्टीचा मनुष्याच्या प्रकृतीवर परिणाम होतो असे घटक अशुध्द हवा, अशुध्द पाणी, ध्वनी, उघडे अन्नचा

Add caption










वायु प्रदुषण शहरामध्ये वायु प्रदुषण सर्वाधिक प्रमाणात असते कारण कारखान्यात निघणारा काळा धुर, मोटार वाहनातून निघणारा काळा धुर, रस्त्यावर चाललेली खोदकाम, यामुळे मनुष्याला शुध्द श्वास घेणे कठिण होऊन बसले आहे. यामुळे मनुष्याला श्वसनाचे आजार होतात

Add caption


जल प्रदुषण कारखान्यातून निघणारे केमिकलचे पाणी, सांडपाणी मानवी वस्तीतून निघणारे सांडपाणी नदी नाल्यामध्ये सोडले जाते त्याचा दुर्गध आजुबाजुच्या परिसरात पसरतो त्यामुळे जलचर प्राण्याचे जीवन धोक्यात आले आहे.








ध्वनी प्रदुषण मनुष्याला शांत वातावरणाची गरज असते परंतू कारखान्यात निघणारा भोंग्याचा आवाज मशिनरीचा आवाज, मोटार गाडीचा आवाज तसेच लाउडस्पीकरचा आवाजामुळे मनुष्य कायमचा बहिरा होउ शकतो.





मानवी जीवनावर होणारे दृष्यपरिणाम ह्या प्रदुषणामुळे मनुष्य जीवन धोक्यात आले आहे. खराब पाण्यामुळे रोगराई पसरत आहे यामुळे मनुष्याला श्वसनाचे आजार होतात तसेच पर्यावरणाच्या प्रदुषणमुळे अवकाळी पाउस पडून येणा-या पिकांचं प्रचंड नुकसान होत आहे.



प्रदुषणावर उपाय
  • सगळीकडे जास्तित जास्त झाडे लावावी त्यामुळे कार्बनडाँयआँक्साईड कमी होण्यासाठी मदत होते
  • पब्लीक ट्रान्सपोटचा जास्तित जास्त वापर केल्यामुळे वायु प्रदुषण कमी होण्यासाठी मदत होते व पर्यावरणातील कार्बनडाँयआँक्साईड कमी होण्यासाठी मदत होते
  • खराब पाण्यामुळे पसरणारी रोगराई होउ नये म्हणून पाणी नेहमी उकळून व गाळून प्यावे.
  • लाउडस्पीकरचा आवाजाचा ञास होउ नये म्हणून लाउडस्पीकरचा आवाज कमी करुन लावावा
  • कारखान्यातून निघणारे केमिकलचे पाणी, सांडपाणी ह्याची नीट विल्हेवाट लावावी

No comments:

Post a Comment