दलितांचे कैवारी म्हणुन डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांना सर्वच लोक ओळखतात. पण त्यांच्या अगोदरही एक महान
समाजसुधारक होउन गेला जो स्वतः उच्चवर्णीय ब्राम्हण होता, पण कैवारी मात्र
दलितांचा व क्षुद्रांचा होता. ती व्यक्ती होती बसवेश्वर(बसवअण्णा). आज
त्यांची जयंती. त्या निमीत्ताने त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याचा
केलेला हा छोटासा प्रयत्न. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील विजापूर
जिल्यातील बागेवाडी या ठिकाणी झाला. बाराव्या शतकात जेव्हा दलितांची
परिस्थीती खरोखरच दयनीय होती, त्या वेळेस त्यांची बाजू घेण्यासाठी हि
व्यक्ती पुढे आली होती. तत्कालीन सनातनी हिंदू धर्मावर आसुड उगारण्याचे महान कार्य त्यांनी केले.
अंधश्रध्देने आणी भेदभावाने पछाडलेल्या लोकांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम
त्यांनी केले. एक महान समाज सुधारक म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते.
ते लिंगायत मानवता धर्माचे संस्थापक होते.आजही दलितांची
परिस्थीती काय आहे ते आपण पाहतोच आहोत. दलित अत्याचार आजही थांबलेले
नाहित. त्याची काही ताजी उदाहरणे जवखेडा आणी खैरलांजी प्रकरणातून आपल्या
समोर आलेलीच आहेत. मग बाराव्या शतकात दलितांची काय परिस्थीती असेल याचा
विचारच न केलेला बरा. त्यावेळी या उच्च वर्णीय समाजाबद्दल ब्र काढण्याची
कोणाची हिम्मत नव्हती. पण अशा परिस्थीतीत बसवेश्वर या समाजाविरुध्द एकटे
उभे राहिले. त्यांना लहानपणापासूनच समाजातील या असमानतेबद्दल भयंकर चिड
होती. उच्चवर्णींयाकडून दलितांवर होणारे अन्याय पाहुन त्यांचे मन पेटुन उठत
असे. त्यासाठी त्यांनी आपली स्वतःची मुंजही करुन घेण्यास नकार दिला.
त्यावेळी ते केवळ आठ वर्षांचे होते. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी आपल्या
या कृतीतून समाजाविरुध्द बंड पुकारले होते. कायदा, चाली, रिती या
सर्वांसाठी समान असायला हवेत या विचारसरणीचे ते होते. त्यांना देव आणी धर्म
मान्य नव्हता. त्यांचा विश्वास निराकारावर होता. माणुस हाच देव आणी
माणुसकी हाच धर्म असे ते मानत असत. जसा त्यांनी उच्च-नीच याला विरोध केला
तसा त्यांनी स्त्री-पुरुष असमानतेलाही प्रखर विरोध केला. स्त्रीयांसाठीचे
आरक्षण हि कल्पना बसवेश्वरांचीच होती. ते नेहमी सांगायचे कि मनुष्य हा
त्याच्या जन्माने थोर होत नाही तर तो त्याच्या कर्मोने थोर होतो. त्यांना
प्रेमाने लोक बसवण्णा म्हणायचे. अण्णा म्हणजे मोठा भाउ. बसवेश्वरांच्या
आचार आणी विचारांनी ते जनमानसाचे खरोखरच मोठे भाऊ ठरले.
No comments:
Post a Comment