पेट्रोलियम पदार्थांच्या बाबतीत
आपण स्वयंपुर्ण नाही आहोत. आपली हि गरज भागवण्यासाठी आपल्याला दुस-या
देशांवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे हे छोटे छोटे आखाती देश
त्यांच्या ईशा-यावर संपुर्ण
जगाला नाचवत आहेत. आज आमेरीकेसारखी महासत्ता देखिल तेलसाठ्यांपुढे लाचार
झाली आहे. आपली बरीच विदेशी मुद्रा आज कच्च्या तेलाच्या खरेदिवर खर्च होत
आहे. आज शेअर बाजारातील निर्देशांकही क्रुड आँईलच्या किमतीवर अवलंबून
असतात. शेवटी हे तेलसाठे नैसर्गीक आहेत, ते कधी ना कधी संपणारच. दुसरी
महत्वाची गोष्ट म्हणजे आयसिस सारख्या आतंकवादी संघटनांमुळे हे तेलसाठे
देखिल नष्ट होत चालले आहेत. उद्या एक परिस्थीती अशी येणार आहे कि, आपल्याला
पाणी वाचवा प्रमाणेच तेल वाचवा, गॅस वाचवा असे म्हणत फिरावे लागणार आहे.
यापैंकी गॅसचे महत्व खुप आहे. गावापासून शहरांपर्यंत आज घराघरात जेवण
बनवण्यासाठी गॅस अतिआवश्यक झाला आहे. वाढत्या महागाईमूळे तर लोकांचे आधिच
कंबरडे मोडले आहे आणी अशी परिस्थीती निर्माण झाल्यास काय होईल याचा विचारच न
केलेलाच बरा. भविष्यात येउ पाहणा-या या अडचणींवर आपण काही अंशी मात करु
शकतो. आणी यात आपलाच फायदा होणार आहे. छोट्या छोट्या काही गोष्टींकडे
तुम्ही लक्ष दिल्यास घरगूती गॅसची मोठ्या प्रमाणावर बचत होउ शकते. त्यासाठी
खालिल काही गोष्टींवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
- १)गॅसवर काहिही बनवण्यापुर्वी आवश्यक सामग्रीची अगोदरच तयारी करुन ठेवणे. यामुळे गॅस आणी वेळ दोन्हिंची बचत होईल.
- २)फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तू लगेच गरम करु नये. त्या गरम करण्यापुर्वी काही वेळ अगोदर बाहेर काढुन ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा त्या वस्तू सामान्य तापमानावर येतिल त्यावेळी त्या गरम कराव्यात.
- ३)वस्तू न झाकता शिजवल्यामुळे तिनपट अधिक गॅस खर्च होतो. त्यासाठी कोणतिही वस्तू बनवताना त्यावर झाकण ठेवणे आवश्यक आहे.
- ४)प्रेशर कुकरचा जास्तीत जास्त वापर करणे. प्रेशर कुकरमध्ये वस्तू लवकर शिजतात आणी गॅसची बचत होते.
- ५)जेवण बनवताना पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. जास्त पाणी टाकल्यास पदार्थ शिजायला जास्त वेळ लागतो, ज्यामुळे गॅस वाया जातो आणी पदार्थ जास्त शिजल्यामुळे त्यातील आवश्यक जिवनसत्वेही नष्ट होतात.
- ६)मटण शिजवण्यासाठी मायक्रोव्हेव चा वापर करा. ते लवकर शिजते. गॅसवर शिजवल्यास जास्त वेळ लागतो. परिणमी गॅस वाया जातो.
- ७)जेवण नेहमी मध्यम आचेवर शिजवावे. गॅस मोठा केल्यास अन्न करपते आणी लहान केल्यास गॅस जास्त जळतो.
- ८)चहा किंवा पाणी सारखे सारखे उकळल्याने गॅस वाया जातो. त्यासाठी चहा किंवा पाणी एकदाच उकळून फ्लास्कमध्ये ठेउन द्यावे.
- ९)पाणी गरम करण्यासाठी गॅस ऐवजी ईलेक्ट्रीक वॉटर हिटर वापरावा.
- १०)जेवण बनवण्यासाठी योग्य आकाराचे भांडे वापरावे.
- ११)ग्रील्ड फुड बनवण्यासाठी गॅसचा वापर न करता ओव्हन वापरावा.
- १२)गॅसचा रेग्युलेटर, पाईप, बर्नर नियमीत तपासा.
- १३)गॅस लिक असल्यास लगेच दुरुस्ती करा.
- १४)गॅसची नियमीतपणे सर्विसिंग करुन घ्या.
- वरिल सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास तुमच्या गॅसची २५ टक्के बचत निश्चितपणे होईल.
No comments:
Post a Comment