Thursday, 30 April 2015

मोबाईल फोन एक अवयव.

मोबाईल फोन शिवाय आपलं आयुष्य आता अशक्य झालं आहे. आता आपल्या हाता-पायांसारखाच मोबाईल फोन हा जणू एक अवयव बनला आहे. जगभरात सगळीकडे मोबाईल फोनचा वापर काही दशकांमध्येच इतका प्रचंड वाढेल अशी कल्पना कुणी केली तरी असेल का? अशा या मोबाईल फोनच्या तंत्रज्ञानामागे किती शास्त्रज्ञांचे आणि संशोधकांचे अफाट परिश्रम आहेत याची जाणीव झाली की त्यांच्या प्रयत्नांना आपण सलामच ठोकू. इतक्या छोट्या उपकरणामध्ये संदेशवहनाच्या संदभाॆतली अमूलाग्र क्रांतीला आपला सलामच आहे.                  
मोबाईल फोनशिवाय आता आपलं पानसुद्धा हलत नाही अजुनही अगदी मोजके लोक मोबाईल फोन शिवाय आपल संदेशवहनाच काम साधत असले तरी बहुसंख्य लोकांना आपल्याकडे या क्षणी आपला मोबाईल फोन नाही ही कल्पना सुद्धा अस्वस्था करून सोडते. काही वषाॆंपूर्वि कुठूनही कोणासही कधीही संवाद साधण्याची ही संकल्पनाच आपल्याला माहीत नव्हती. आधीच्या पिठ्यांमधल्या लोकांना तर साधा लँडलाईनवाला टेलिफोन वापरायला मिळण ही सुद्धा चांगल वाटावी अशी परिस्थीती होती. आता मात्र मोबाईल फोन आणि त्याच्या जोडीला असलेलं इंटरनेट यांच्यामुळे माणसं आेव्हरकनेक्टेड असल्याची विचित्र समस्या मानसिक आजारांपासून अनेक वेगवेगळ्या दुष्पिरणामांना कारणीभूत ठरत चालल्याचं चित्र स्पष्ट होत चाललं आहे. मोबाईल फोनमुळे संदेशवाहनाबरोबरच इतर बाबतींमध्ये सुद्धा क्रांती घडताना दिसत आहे. उदाहरणाथॆ काही वषाॆंनी क्रेडीट काडाॆंची संकल्पनासुध्दा मोबाईल फोन इतिहासजमा करू शकतील असं मानंल जातं.  मोबाईल फोनचा वापर करून  कुठलाही माणूस आपली बिलं भरणं किंवा खरेदी करून झाल्यावर त्यासाठीची रक्कम चुकती करण असे व्यवहार सहजपणे करू शकतील.            
             मोबाईल फोनचं तंत्रज्ञान तसं अलीकडचं असलं तरी यामागे अत्यंत रंजक इतिहास आहे.  मोबाईल फोन चालण्यासाठी विज आणि चुंबकत्त्व यांच्या एकत्रीकरणातून जन्मणारं विद्यूतचुंबकाचं म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिझमंच तत्त्व आवश्यक असतं मोबाईल फोनमधून आपल्याला एेकू येणारं बोलणं किंवा आपल्या मोबाइल फोनमधून ऐंकू येणार बोलणं किंवा आपल्या मोबाईल फोनवर येत असलेले संदेश हे सगळ आपल्याला न दिसणा-या  अदृश्य बिनतारी लहरींच्या माध्यमातून येतं असतं हे आपण जाणतोच.  या अदृश्य बिनतरी लहरी म्हणजे विद्युतचुंबकीय लहरीच असतात.  त्यांची ताकद इतकी अफाट असू शकेल ही कल्पनाच खरं म्हणजे सनसनाटी आहे ! कित्येक महान शास्त्रज्ञांच्या संशोधनातून हे तत्व पूढे जात राहील आणि त्यातून मोबाइल फोनची संकल्पना जमू शकली !

No comments:

Post a Comment