ग्राहकांच्या हक्काबाबत इग्लंड व
अमेरिकेत १९६० सालापासूनच जागृती झाल्याचे दिसुन येते. तिथे ग्राहक संघटित
झाल्यामूळे ग्राहकांच्या हक्कांसाठी कायदे करणे सरकारला भाग पडले.
भारतामध्ये मात्र हा कायदा यायला १९८६ साल उजाडावे लागले.
असो देर आये दुरुस्त आये. सरकारने तर आपले काम केले.
पण त्याचा फायदा मात्र अजुन पर्यंत म्हणावा तसा होत नाही. त्याचे कारण कि
लोकांना अजुन ग्राहकांचे हक्क कोणते हेच माहित नाही आहे. तर त्याचा वापर
करणे तर खुप दुरची गोष्ट.तर चला आज आपण जाणुन घेउया ग्राहकांच्या
हक्कांविषयी.
१)ग्राहकाच्या आरोग्याचे रक्षण झाले पाहिजेः याचाच अर्थ काय तर
उत्पादकांनी ग्राहकाच्या आरोग्याला हानी पोहोचेल अशा कोणत्याही वस्तूचे
उत्पादन करु नये. आरोग्याला अपायकारक असे कोणतेही रंग, स्वाद अथवा केमिकल
यांचा वापर करुनये.
२)माहिता मिळवण्याचा हक्कः ग्राहकांना ते खरेदी करत असलेल्या वस्तुबद्दल पुर्ण माहिती मिळणे आवश्यक आहे. उदा. मालाचे वजन, माल वापरण्याची पध्दत, उत्पादनाची तारिख, वस्तुच्या उत्पादनासाठी वापरलेले घटक, वगैरे वगैरे. हि माहिती वस्तुच्या वेष्टनावर छापलेली असावी. उत्पादक व व्यापा-यांनी याबाबत खोटी जाहिरात करुन ग्राहकांची फसवणूक करु नये.
३)निवडीचा हक्कः बाजारात वस्तुचे अनेक प्रकार उपलब्ध असले पाहिजेत. ज्यातुन ग्राहकाला आपल्या गरजेनूसार आपल्याला आवडेल तो माल विकत घेता आला पाहिजे. म्हणजेच उत्पादकांनी संगनमत करुन ग्राहकाला ठराविक वस्तुच विकत घ्यायला लावू नये.
४) तक्रार करण्याचा हक्कः ग्राहकाला तक्रार करण्याचा अधिकार हवा. त्या तक्रारीची योग्य ती दखल घेउन त्याला न्याय मिळण्याची व्यवस्था हवी. ग्राहकाचे समाधान न झाल्यास त्याला तक्रार करता आली पाहिजे. तसेच उत्पादकांनी त्यांच्या तक्रारी दुर केल्या पाहिजेत. त्यांचे काही नुकसान झाले असल्यास ते नुकसान भरुन दिले पाहिजे.
५) आरोग्यदायी वातावरणाचा हक्कः उत्पादकांनी पाणी, हवा, आवाज, वगैरेंचे प्रदुषण होणार नाही याची आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. पर्यावरणाचे संरक्षण हि खरोखरच अत्यावश्यक बाब झाली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे.

No comments:
Post a Comment