Monday, 20 April 2015

अक्षय तृतीया

वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक म्हणुन या तिथीला खुप महत्व आहे. या दिवशी प्रत्येकजण आपापल्या परिने काहितरी नविन करण्याचा प्रयत्न करत असतो. या मुहूर्तावर

शुभ वेळ पहायची आवश्यकता लागत नाही. हा पुर्र्ण दिवस शुभ असतो. या दिवशी चांगली कामे पार पाडण्याकडे लोकांचा कल असतो. कोणी लग्न करतं, कोणी घर घेतं, कोणी साखरपूडा करतो, तर कोणी गाडी घेतो. या मुहूर्ताची लोक अक्षरशः चातकाप्रमाणे वाट पहात असतात. हा दिवस हिंदूंसाठी तर महत्वाचा आहेच पण त्याबरोबर जैन लोकांसाठीही या दिवसाचे विषेश महत्व आहे. अक्षय या शब्दाचा अर्थच मुळात कधीही क्षय न पावणारे ते अक्षय म्हणजेच कधिही नष्ट न होणारे असा आहे. म्हणुनच हा शुभ मुहूर्त साधण्याकडे जास्तीत जास्त लोकांचा कल असतो. या दिवसापासूनच त्रेता युगाचा प्रारंभ झाला होता असे म्हटले जाते. त्रेता युग म्हणजे रामायण काळ होय.याच दिवशी श्री विष्णूचा सहावा अवतार मानला गेलेल्या परशुराम भगवानांचा जन्म झाला होता. याच दिवशी व्यास मुनी आणी गणपती यांनी महाभारताचे लिखाण करायला घेतले होते. या दिवशी दान करण्याला विषेश महत्व आहे. त्यातल्या त्यात जर दान गोड वस्तूंचे असेल तर अतिउत्तम. या दिवशी आंब्याचे दान करणे ईष्ट ठरते. मुळात आंबे खाण्याची सुरुवातच या दिवसापासून केली जाते. या दिवशी शक्य असल्यास उपवास करावा. समुद्रस्नान अथवा गंगास्नान करावे. या दिवशी सर्व प्रकारचे अन्न धान्य आणीउपयूक्त वस्तूंचे दान करण्याची प्रथा आहे. प्रत्येकाने यथाशक्ती दान केल्यास चांगले फळ मिळते. हा दिवस दान, हवन आणीश्राध्द करण्यास उपयूक्त समजला जातो. या दिवशी नविन संकल्प केले जातात. नविन व्यवसाय सुरु केले जातात. सोने चांदी खरेदी केले जाते. जड-जवाहीर खरेदी केले जाते. थोडक्यात काय तर कोणतेही चांगले काम या दिवशी केल्यासते अक्षय म्हणजेच कायमस्वरूपी टिकुन रहाते. तर अशा या अक्षय तृतीयेच्या आणी या शुभ मुहूर्ताच्या आपणा सर्वांना खुप खुप शुभेच्छा.

No comments:

Post a Comment