साहित्य – एक आंबाडयाची पालेभाजीची एक जुडी, मध्यम दोन कांदे, 10 ते 12 लसणाच्या पाकळया, 5 ते 6 मिरच्या आणि चवीनुसार मीठ, तळण्यासाठी दोन चमचा तेल.
कृती – अंबाडीची भाजी निवडून घेणे, त्यानंतर ती स्वच्छ
पाण्यात भाजी धुवून घेणे, तव्यावर एक चमचा तेल टाकणे, ती भाजी त्यामधे परतवून एका
भांडयात काढणे, त्यानंतर पुन्हा एक चमचा तव्यावर तेल टाकून चिरलेला कांदा व मिरची
एकामागोमाग तळून घेणे. त्यानंतर भाजलेली अंबाडीची भाजी तळलेला कांदा व मिरची एकत्र
करून त्यामध्ये लसूण व मीठ टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे.
अशा प्रकारे
अंबाडीची चटणी तयार होते.
No comments:
Post a Comment