Sunday, 26 April 2015

रूढी की बेडी?

पल्या समाजात जे काही संकेत आहेत, रूढी आणि परंपरा आहेत, त्या प्रामुख्यानं स्त्रियांसाठी आहेत आणि या सर्व प्रथा परंपरांचा संबंध थेट संस्कृतीशी असतो आणि संस्कृतीचा मूल्यांशी. त्यामुळे असं मानलं जातं की, ज्या स्त्रिया मनोभावे आपल्या समाजातील संकोच, रूढी, परंपरा यांचं पालन करतात, त्या आपल्या संस्कृतीची अन् मूल्यांची जोपासना करीत असतात. पण हे सारं स्त्रियांनी करायचं असतं, ते पतीसाठी. विवाहित स्त्रीनं कुंकू लावायचं, मंगळसूत्र घालायचं, ते पतीच्या नावानं. वटपौर्णिमेला वडाची पूजा करीत सात फेरे घ्यायचे, ते जन्मोजन्मी हाच पती लाभो म्हणून!

मग यात स्त्रीला कोणतं स्वातंत्र्य आहे ?
जर नसेल, तर रूढी ही स्त्रीच्या पायातली बेडी ठरते.. पुरूषप्रधान संस्कृतीनं तिला बहाल केलेली! या संदर्भात अपरिहार्यपणे काही प्रश्न उभे राहतात. या रूढी, परंपरा फक्त स्त्रियांसाठीच का असाव्यात? स्त्रियांच्या भल्याचा कुठला विचार त्या मागे असतो? स्त्रियांविषयी कुठला दृष्टिकोन आढळतो?
स्त्रियांना यामध्ये  जर दुय्यमच लेखलं जात असेल, त्यांच्या पतिपरायणतेवर याद्वारे जर शिक्कामोर्तबच होत असेल, तर स्त्रियांनी त्या का पाळाव्यात? पुढचा प्रश्न साहजिकच हा येतो की, स्वत:लाच दुय्यम लेखून स्त्रिया हे संकेत, या प्रथा इमानेइतबारे- अनेकदा तर उत्साहानं का पाळत असतात

No comments:

Post a Comment