Thursday, 30 April 2015

धनंजय कुलकर्णी (पोलिस उपायुक्त परिमंडळ पाच)

सामाजीक बांधिलकी जपणारा अधिकारी
मुंबई पोलिस म्हटले कि, समोर उभे रहाते एक भारदास्त व्यक्तीमत्व. अशाच एक व्यक्तीमत्वांपैकी आहेत धनंजय रामचंद्र कुलकर्णी.विज्ञान शाखेतुन पदविधर होउन महारा्ष्ट्र सेवेतरुजू झालेले धनंजय कुलकर्णी यांनी llbआणी mbaसुध्दा केलेले आहे. नगर जिल्यातील हा गुणी अधिकारी १९९८ साली पोलिस दलात भरती झाला.
नागपूर शहर, गडचिरोली, जालना, सातारा आणी पुणे अशा प्रवासा नंतर आता पोलिस उपआबूक्त म्हणुन ते मुंबईत कार्यरत आहेत. गडचिरोली येथे असताना नक्सलीविरोधी त्यांची कारवाई खरोखरच वाखाणण्याजोगा
होती.पोलीस आबुक्तंचे प्रवक्ते म्हणुन २०१४ पासुन ते काम पहात आहेत. शेतकरी कुटूंबातील असल्याने शेतीची आवड त्यांना लहेनपणापासूनच आहे. यान्यतीरीक्त त्यांना टेनीस खेळणेही आवडते. सध्या सगळीच क्षेत्रे हेल्थ कॉन्शीअस झलेली असताना पोलीस दल तरी या मध्ये कसे पाठी राहीलपोलिसांच्या अंगी हे गुण बाणावेत म्हणुन गेल्याच महिन्यात सर्व सिनीअर पोलिसांसाठी पाच कि. मी. जलद चालण्याची स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्यात पहिले पारीतोषीक पटकावले ते धनंजयय कुलकर्णी यांनी. ईतर पोलिसांप्रमाणेच सगळ्यांचा कॉमन प्रॉब्लेम असलेल्यासुट्टी या विषयावर त्यांना छेडले असता त्यांना बोलण्यास नकार दर्शवीला. पण त्यांच्या भावना ते लपवू शकले नाहीत. त्यांच्या आयुष्यातला एक किस्सा येथे खरोखरच सांगण्यासारखा आहे. त्यावेळेला तेजळगाव येथे अप्पर पोलिस अधिक्षक म्हणुन कार्यरत होते. त्यावेळी एका मुलिच्या लग्नाबाबत खुप मोठा वाद झाला होता. तो वाद लिर्वीवादपणे सोडवून त्या मुलिचा घर आणी सेसार कुलकर्णी यांनी वाचविले. त्यांचे हे उपकार आणी त्यांच्यातील दयाभाव त्या मुलिचे वडिल कधीच विसरले नाही. तर जेव्हा धनंजय कुलकर्णी यांची बदली झाली त्यावेळी शासनाने त्यांची बदली करु नये म्हणुन त्यांनी सरळ शासनालाच एक पत्र लिहीले होते. सामाजीक बांधिलकी कुलकर्णी यांनी कशाप्रकारे जपली होती हे सांगायला दुसरे उदाहरण देण्याची गरज नाही. सध्याचे जग हे ईंटरनेटचे जग आहे. या ईंटरनेटचे जेव्हडे फायदे आहेत त्यापेक्षा जास्त नुकसान आहे. यामुळे आता निरनिराळ्या प्रकारचे सायबर गुन्हे घडू लागलेले आहेत.धनंजय कुलकर्णी यांनी सायबर गुन्हे शाखेचेही काम पाहिलेले आहे. सायबर गुन्हे रोखण्यारासून ते घडल्यानंतर त्याचा छडा लावण्यापर्यंत त्यांनी यश मिळवले आहे. सायबर सुरक्षेविषयी चर्चा
केली आसता, बरेच कायदे हे निरुपयोगी झाल्याने त्यांना वगळवे पाहिजे असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. पोलिस उप-अधिकारी म्हणुन नागपूर येथे रुजु झालेला हा अधिकारी ८-८-२०१४ पासुन पोलिस उप-आयुक्त म्हणुन कार्यरत आहे. या त्यांच्या प्रवासात त्यांनी कायदा व सुव्यवस्था चोख राखण्याचे काम त्यांनी जिकरीने केलेले आहे. वृत्त वाहिन्या व प्रसार माध्यमे यांच्याशी त्यांनी कायम सलोख्याचे संबध प्रस्थापीत केलेले आहेत. आपली भुनिका मांडताना ते कधी शांत तर कधी कणखरबनलेले हि आम्ही पाहिलेले आहे. लोकांच्या सुरक्षेला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. तर अशा या सामाजीक बांधिलकी जपणा-याया हरहुन्नरी अधिका-याला त्यांच्या पुढिल वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.

No comments:

Post a Comment