Thursday, 30 April 2015

शिवाजी महाराज



शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या मातोश्रीचे नाव जिजाबाई व वडीलांचे नाव शहाजीराजे होते ते निजामशहाच्या दरबारी ते एक सरदार म्हणून काम करत होते. शहाजीराजांकडून युद्ध आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन मिळाले, तसेच दादोजी कोंडदेव कडून दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण, जिजाबाई यांनी शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस संत एकनाथ, संत तुकाराममहाराज रामायण,भारूड इत्यादींच्या माध्यमातून महाराजांच्या मनात चांगले संस्कार केले आणि महाराजांना स्वराज्याचे शिक्षण दिले.

शाहिस्तेखान हा प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत होता, जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस करी. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला मारण्याचे ठरविले जेव्हा शिवाजी महाराज शाहिस्तेखानच्या खोलीत प्रवेश केला. तेव्हा शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली

शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.

No comments:

Post a Comment