गरीबी
ही चंचल तरूणीसारखी असते, आयुष्याच्या कोणत्याही वळणावर ती हातमिळवणी
करायला तयार असते, याउलट श्रीमंती ही एखाद्या रूपगर्वितेसारखी स्वाभिमानी
असते, श्रीमंती सहजासहजी प्राप्त होत नाही,
तिचा अनुनय आराधना करावी लागते, तिला प्रसन्न करण्यासाठी काही पराक्रम
चमत्कार करावा लागतो, तिची मनधरणी करावी लागते, गुणगाण गावे लागतात,
प्रसंगी प्राण प्रतिष्ठाही पणाला लावावी लागते तेव्हाच कुठे समृद्दी
गजगतीने आपल्या जिवनात प्रवेश करते. जगातील लाखो लोक आपणही कधी तरी
भाग्योदय होईल, देवाची आपल्यावर कधीतरी कृपा होईल माझ्याही कुंडलीतील ग्रह
कधी तरी प्रसन्न होतील एकवेळ तरी आपल्याला चांगले दिवस येतील, आपलाही धंदा
जोर धरेल व आपली इतक्या दिवसांची तंगी दूर होईल, या आशेवर जगत असतात व त्या
मध्येच कित्येकांचा अंतही होतो, असेल जर माझा हरी तर तो देईल मला
खाटल्यावरी हे काही योग्य नव्हे, नशिबावरच अवलंबून राहणं हा काही शहाणपणाचा
भाग नाही.
चांगल्या मार्गाने प्रचंड पैसा मिळवणं हा काही
नशिबाचा भाग नसून ती एक कला आहे, हे माहित नसले तरी ते एक शास्ञ आहे, आणि
ते शिकता येते.
No comments:
Post a Comment