आजच्या आधुनिक जगात
जागतिकीकरणामुळे अनेक राष्ट्रात विविध क्षेत्रात आणी चहुबाजूंनी
वेगवेगळ्या प्रकारचे बदल मोठ्या प्रमाणावर होत असताना आढळतात. जागतिकीकरण
हि प्रक्रीया जास्त गुंतागुंतीची असुन त्याचे परिणाम जगाच्या कानाकोप-यात
जाणवू शकतात. एवढी ती प्रभाविही आहे.
जागतिकीकरणाचे मुळ गेल्या दोन तिन
दशकातील वैज्ञानिक प्रगतीत तसेच माहिती आणी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील
क्रांतीत आहे. जागतिकीकरणामूळे राष्ट्राराष्ट्रांच्या आर्थीक,
औद्योगिक व काही प्रमाणात राजकिय क्षेत्रात जसजसे बदल होत आहेत, तसतसे त्या
त्या समाजातही स्थित्यंतरे होत आहेत. ग्लोबल विलेज हि संकल्पना उदयास येत
असुन जगाच्या एका कोप-यातून दुस-या कोप-यापर्यंत संपर्क साधणे सहज शक्य होत
आहे. त्यामुळे व्यापाराचा, आर्थीक उलाढालीचा, वस्तू आणी सेवा यांची ने आण
करण्याचा वेग व व्याप वाढत आहे. संबधीत वहुतांश कामे यंत्रांच्या सहाय्याने
होत असल्याने या समाज रचनेतील माणसाला यंत्र चालविता येणे आवश्यक झाले
आहे. जागतिकीकरणाच्या संकल्पनेत कोणत्याही एका देशाने किंवा आर्थीक शक्तिने
दुस-या देशात शासन किंवा प्रशासन करणे अभिप्रेत नाही. प्रत्येक देश
सार्वभौम व स्वतंत्र आहे. असे मानुन त्या दृष्टिकोनातून प्रत्येक देशाने
ईतर प्रत्येक देशाला सर्व प्रकारच्या आर्थीक व्यवहारामध्ये समान वागणुक
देणे अभिप्रेत आहे. भौगोलिक, राजकिय परिस्थीती मधिल बदल , नविन
तंत्रज्ञानाचा उदय आणी अर्थविषयक नविन संकल्पना व त्यांच्या बरोबरीनेच
उदयास आलेला नविन मध्यम वर्ग या घटकांमूळे जागतिकीकरण हि बाब आता अनिवार्य
झाली आहे. हा कोणाच्याही ईच्छेचा प्रश्न आता राहिला नसुन ती स्विकारणे
किंवा तिला नाकारुन आपली प्रगती थांबविणे एवढेच आपल्या हातात राहिले आहे.
No comments:
Post a Comment