नमस्कार मित्रांनो, वाहन चालकाचे जीवन म्हणजे तारे वरची कसरतच आहे. आपल्या या भारत देशात जंगली जनावरांवर चर्चा करायला वेळ आहे. रस्त्यावर फिरणा-या कुत्र्यांवर चर्च्या करायला वेळ आहे. पण जिवंत माणूस, तो म्हणजे वाहन चालक. याच्या वर विचार करायला कोणालाच वेळ नाही. वाहन चालक हा स्वताच्या घरी कधीच वेळेवर पोहचत नाही.
पोलीस असो, रिक्षावाला
असो, टॅक्सी चालक असो किंवा इतर कोणताही खाजगी वाहन चालक असो, ज्या दिवशी वाहन चालकाला लवकर जायचे असते त्याच दिवशी मालकाचे अर्जन्ट काम निघते.पोलिस वाहन चालक, बिच्यारे १२-१२ -तास ड्युटी करतात. त्यांना तर प्रत्येक सणाला सुध्दा काम करायला लागते. वाहन चालकाने कितीही चांगले काम केले तरीही त्यांच्या पाठीवर कधीही शाब्बासकीची थाप कोणीच देत नाही. किंवा त्याला बढतीही दिली जात नाही. अपघात झाला तर तो वाहन चालकाच्या चुकीनेच झाला .असे गृहित धरले जाते. त्यात रस्त्यात पडलेले खड्डे, मधेच येणारा कुत्रा, अचानक येणारा माणुस ह्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात कधी कधी अपघात होतात. पण चुक फक्त वाहन चालकाचीच धरली जाते. खाजगी ठिकाणी काम करणारा वाहन चालक जर आजारी पङला किंवा अपघातात जखमी झाला तर मालक त्याला ख्रर्च देत नाही. जरी दिला तरी लगेच पगारातुन कापुन घेतला जातो. मित्रांनो, शेवटी वाहन चालक हा वाहन चालकच रहातो, आणी वाहन चालक म्हणुनच त्याचा अंत होतो,,,,,,,,.
No comments:
Post a Comment