प्रिय गुरुजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ,
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा,
जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधूचरित , पुरुषोत्तमही
स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित ‘ करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी , तसे जपणारे मित्रही,
मला माहित आहे ! सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत, तरीही ज
मलं तर त्यांच्या मनावर ठसवा, घाम गाळून कमावलेला एकच छदाम,
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला ,
तुमच्यात शक्ती असती तर, त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा आणि शिकवा त्याला आपला हर्ष
संयमाने व्यक्त करायला